कांदा उत्पादक प्रश्नी, धनंजय मुंडे केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेणार

0
32

 

बीड – केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. यामुळे कांद्याचे दर घसरण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे नुकसान कसे टाळणार, याबाबत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना विचारले असता केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले
कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा खरेदी करणारे ग्राहक या दोघांचेही नुकसान होणार नाही. अशा पद्धतीने मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय कृषीमंत्री यांची दिल्ली येथे भेट घेणार आहे. त्यानंतरच या प्रश्नावर मार्ग निघू शकेल, असे धनंजय मुंडे म्हणाले

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा