
बीड – टोमॅटोनंतर आता कांद्याचीही होत असलेली दरवाढ लक्षात घेता केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याची घोषणा केल्याने शेतकरी वर्गातून मोठा रोष व्यक्त होत आहे. हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी वर्ग तसेच विविध सघंटना या निर्णयाच्या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारकडून प्रथमच कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिल ते ४ ऑगस्ट दरम्यान ९.७५ लाख टन कांद्यांची निर्यात झाली आहे. बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब सर्वाधिक कांदा निर्यात झाला. यामुळे शेतकरी वर्गाला दोन रूपये मिळतात, तेच कुठे आता कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता शेतकरी नेते अजित नवले चांगलेच संतापले