विनापरवाना साठवणूक, २.३८ कोटी रुपयांचे खत जप्त

0
33

 

अमरावती  AMRAWATI- अमरावती जिल्ह्यातील माहुली जहांगीर येथे गोदामात अनधिकृत व विनापरवानगी साठवणूक केलेल्या 11579 रासायनिक, सेंद्रिय खतांच्या बॅग Bags of chemical, organic fertilizers  व द्रवरूप खतांचा साठा असा २ कोटी ३८ लाखांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशात नोंदणीकृत एका कंपनीचे हे खत असल्याचे कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी माहुली जहांगीर पोलीस ठाण्यात ४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अमरावती पं.स. चे कृषी अधिकारी उद्धव मयेकर यांच्या तक्रारीवरून माहुली ठाण्यात भादंवि 420,34 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 याशिवाय रासायनिक खते (नियंत्रण) आदेशाच्या विविध कलमान्वये सुनील कुमार (उत्तर प्रदेश), सांभा अडपाल (क्षेत्रीय व्यवस्थापक, माहुली), अनंत वाडोकर (माहुली), पुरुषोत्तम साबळे (माहुली), महेशकुमार जाठ (भोपाल) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उद्धव भायेकर, कृषी अधिकारी, अमरावती यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा