वडेट्टीवारांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसचा एक गट नाराज-खासदार जाधव

0
42

बुलडाणा BULDHANA  : काँग्रेसने अलिकडेच Vijay Vadettiwar विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते पदावर संधी दिल्याने काँग्रेसचा एक मोठा गट नाराज आहे. तो महायुतीमध्ये सहभागी होऊ शकतो, असा दावा बुलडाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव (Shiv Sena MP Pratap Jadhav) यांनी केला आहे. आता काँग्रेसमध्ये फूट पडू शकते, असेही ते म्हणाले. खासदार जाधव यांनी नाराज नेत्यांची नावे मात्र उघड केलेली नाहीत.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात पक्षात बरेच दिवस मंथन चालल्यावर काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. त्यामुळे काँग्रेसमधील काही बडे नेते नाराज झाले असल्याचा दावा खासदार जाधव यांनी केला आहे. या नेत्यांचा गट लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहेत. ते महायुतीमध्ये सहभागी होतील, असा दावाही जाधव यांनी केला आहे. जाधव म्हणाले, वरिष्ठ लोकांना डावलून वडेट्टीवार यांच्यासारख्या ज्युनिअर नेत्याला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने काँग्रेसमधील सगळे वरिष्ठ नेते अतिशय अस्वस्थ झाले आहेत. त्यांची नावे घेण्याची गरज नाही. ती सर्वांनाच माहिती आहेत. ते सर्वजण अतिशय अस्वस्थ झाले आहेत. ते योग्य निर्णय घेण्याच्या तयारीत असून ते महायुतीत सहभागी होतील, असे खासदार जाधव म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा