भाजपशी समझोता न केल्याने माझ्यावर कारवाई-अनिल देशमुख

0
36

मुंबई MUMBAI -राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या SHRAD PAWAR शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख ANIL DESHMUKH यांनी भाजपवर  BJP गंभीर आरोप केले आहेत. माझ्यावर समझोता करण्यासाठी भाजपचा दबाव होता. मी नकार दिल्याने परमवीर सिंह यांना माझ्यावर खोटे आरोप लावायला लावले. दुसऱ्याच दिवशी माझ्यावर छापे घालण्यात आले, असा आरोप देशमुखांनी (NCP Leader Anil Deshmukh) केला आहे.

देशमुख म्हणाले की, मी सरळ सांगितलं की मी कोणत्याही पद्धतीने समझोता करणार नाही आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्यावर छापे पडले. माझ्यावर कारवाई करण्यात आली, ही वस्तुस्थिती आहे, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप अनिल देशमुखांवर आहे. १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्यांना जेलवारीही झाली होती. ईडीच्या दाव्यानुसार, बडतर्फ करण्यात आलेला सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली. ते नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला पैसे सोपवले, असेही तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा