“दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” अभियानांतर्गत दिव्यांग मेळावा

0
66

 

अमरावती- AMRAWATI  ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान राज्यस्तरावर राबविण्यात येणार असून या अभियानाची सुरुवात अमरावती जिल्ह्यातून सुरू झाली आहे. अमरावतीच्या नेमाणी इन हॉल येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात हजारो दिव्यांग उपस्थित आहे, दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांगांच्या विविध योजनांबाबतची माहिती देण्यात आली तर दिव्यांगाच्या विविध समस्या यावेळी अध्यक्ष आ बच्चू कडू BACHCHU KADU  यांनी स्वतः उपस्थित राहून ऐकल्या. संजय गांधी निराधार योजना, जात प्रमाणपत्र, पॅन कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, मतदार नोंदणी, दिव्यांगांना युडीआयडी लाभ दिव्यांगाना मेळाव्यात दिले जाणार आहे.16 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान असून सर्व जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत असून दिव्यागांच्या समस्या ऐकून एक नवं धोरण आखू, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे प्रमुख बच्चू कडू यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा