आशिया क्रिकेट चषक: तिलक वर्माला संधी, चहल, अश्विनला डच्चू

0
35

नवी दिल्ली: क्रिकेटच्या विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून समजल्या जाणाऱ्या आशिया चषकासाठी निवड करण्यात आलेल्या भारतीय संघात तिलक वर्माला संधी देण्यात आली असून युजवेंद्र चहल आणि आर.अश्विन यांना मात्र संधी देण्यात आलेली नाही. आशिया चषकात भारतीय संघ संपूर्ण ताकदीने उतरला आहे. (Asia Cup 2023 Team India Squad) या संघात रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि इशान किशन Rohit Sharma, Shubman Gill, Virat Kohli and Ishan Kishan हे आघाडीचे फलंदाज असतील. तिलक वर्मा यालाही संघात संधी देण्यात आलीय. मात्र, गोलंदाज युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांना यावेळी संधी देण्यात आलेली नाही. आशिया चषकाच्या माध्यमातून तिलक वर्मा वनडेमध्ये पदार्पण करणार आहे. त्याशिवाय राहुल आणि श्रेयस अय्यर यांचेही पुनरागमन झाले आहे. हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी देण्यात आली. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असणार आहे.

निवड समितीने आशिया चषकासाठी निवडलेला भारताचा संघ असा आहे-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (पर्यायी विकेटकिपर)

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा