“..पण, पवार एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री झालेले नाहीत” : वळसे पाटील

0
42

मुंबई-राष्ट्रवादीच्या B अजित पवार गटातील नेते व राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रथमच शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. (NCP Leader Dilip Walse Patil on Sharad Pawar) वळसे म्हणाले की, शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही, असे आपण म्हणतो. परंतु, महाराष्ट्रातील जनतेने SHRAD PAWAR शरद पवार यांना एकदाही बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही, अशी बोचरी टीका वळसे पाटील DILIP WALSE PATIL  यांनी केली. पुण्यातील मंचर येथील जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

वळसे पाटील म्हणाले, शरद पवार यांना एकदाही स्वबळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले नाही. देशातील अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पाहिले तर ते पुढे जात आहेत. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. आपल्याकडे शरद पवारांसारखे नेते आहेत. मात्र, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपल्या राष्ट्रवादीचे केवळ ६० ते ७० आमदार निवडून येतात. त्यानंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते, याकडे वळसे पाटील यांनी लक्ष वेधले. कोणाला माझ्याविरोधात ईडीची नोटीस सापडली तर मी आमदारकीचा लगेच राजीनामा देईल, असा पलटवारही त्यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर केला. आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो, याचा अर्थ आम्ही भाजपमध्ये गेलो असा नाही. ईडीच्या नोटीसमुळे आम्ही सरकारमध्ये सहभागी झाल्याचा अपप्रचार अत्यंत अयोग्य आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वळसे पाटील यांच्यावर टीका केली असून वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले, अशी प्रतिक्रिया दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा