चांद्रयान-३ कडे लागल्या जगाच्या नजरा

0
95

नवी दिल्ली NEWS DELHI -रशियाचे लुना-25 हे अंतराळयान कोसळल्याने आता भारताच्या चांद्रयान-3 Chandrayaan-3 मोहीमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागेलेले आहे.चांद्रयान-3 हे चंद्राच्या जवळपास पोहोचले असून २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरण्याची अपेक्षा आहे. हे लँडीग यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. इस्त्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची छायाचित्रे पाठविली आहेत. चांद्रयान-3 मध्ये बसवण्यात आलेल्या लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेरा (LHDAC) मधून हे फोटो घेण्यात आले असून या कॅमेऱ्याची यान उतरविण्यासाठी सुरक्षित जागा शोधायला देखील मदत होणार आहे. चांद्रयान-3 लँडरला 25 किमी उंचीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरायला 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागणार असून त्या दृष्टीने 23 ऑगस्ट हा काळ मोहिमेतील सर्वात गंभीर राहणार असल्याचे इस्त्रोच्या सूत्रांनी सांगितले.

 

सहा चाकी प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून रॅम्पने बाहेर येईल आणि इस्रोकडून आदेश मिळताच चंद्राच्या पृष्ठभागावर तो चालू लागेल. या दरम्यान त्याची चाके चंद्राच्या मातीवर भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि इस्रोच्या लोगोची छाप सोडतील, अशी माहितीही देण्यात आली.

रशियाची मोहीम अशस्वी

दरम्यान, रशियाची चंद्रावरील मोहिम रविवारी अपयशी ठरल्याचे स्पष्ट जाले. रशियाची अंतराळ संस्था रोसकोसमॉसने रविवारी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी ०५:२७ वाजता नियंत्रण कक्षाचा या यानाशी संपर्क तुटला. लूना-२५ हे ११ ऑगस्ट रोजी वोस्टोनी कॉस्मोड्रोम येथून सोयुझ रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले होते. २१ ऑगस्ट रोजी लुना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा