हर हर महादेवाच्या जयघोषात भाविकांनी घेतले प्रभू नागनाथाचे दर्शन

0
37

 

तीर्थक्षेत्र औंढा नगरीत मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा

– बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथील नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यासह दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात ,तामिळनाडू आंध्रप्रदेश तेलंगाणा,मराठवाडा सह हिंगोली परभणी- लातुर नांदेड,वाशिम ,अकोला,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र आदी भागातील भाविकांचाही त्यात समावेश होता. बम बम बोले…हर हर महादेव…. श्री नागनाथ महाराज की जय च्या जयघोषाने परिसर भक्तीमय झाला होता .तसेच पंचक्रोशीतील अनेक शिवभक्त हे अनवाणी पायाने देखील नागनाथ मंदिरात दाखल झाले होते. देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ विठ्ठल परळीकर यांनी मध्यरात्रीनंतर दोनला महापूजा केली. ब्राह्मण वृंदांनी महापूजेची आवर्तने म्हटली.दिवसभर नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होती. महापूजेनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. गर्भ घरात जाऊनच दर्शन घ्यावे लागत असल्याने आणि जाण्या येण्याचा एकच मार्ग असल्याने दर्शनासाठी वेळ लागत होता. तरीही भाविकांनी शांततेत नागनाथाचे दर्शन घेतले. संस्थांतर्फे सकाळी प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडीचे वाटप केले.नागनाथ मंदिरासह परिसरामध्ये पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता .तसेच श्रावण व नागपंचमीनिमित्त औंढा नागनाथ मंदिरामध्ये दिंड्यासह कावड घेऊन शिवभक्त आले होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा