सना खान हत्याकांड नवे वळण चित्रफितीतून होणार नवे खुलासे

0
39

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या नेत्या सना खान यांचे हत्याकांड मृतदेह सापडलेला नसताना नव्या वळणावर आले आहे. सनाचा वापर तिचा मारेकरी तथाकथित पती अमित उर्फ पप्पू शाहू हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील अनेक राजकीय नेत्यांकडे आणि पदाधिकाऱ्यांकडे शारीरिक संबंधासाठी पाठवत होता. त्यांच्या शारीरिक संबंधाच्या चित्रफिती आणि अश्लील छायाचित्र काढून त्याचा वापर व्यक्तीगत स्वार्थासाठी करीत होता या माध्यमातून या टोळीने कोट्यवधी रुपये लुबाडल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. सनाच्या आईने रविवारी यासंदर्भात अमित शाहूने सनाला गैरमार्गाला लावल्याचा आरोप करणारी तक्रार दाखल केल्यानंतर नवीन माहिती पोलीस सूत्रांकडून पुढे आली. सना मार्च 2021 पासून अमितच्या संपर्कात असून आधी तिला विश्वासात घेतल्यानंतर दोघांचे हॉटेल उघडण्यासाठी व्यावसायीक संबंध बळावले. पुढे दोघेही अतिशय जवळ आल्याने लग्न केले. मात्र, ज्या चित्रफितीतून यांनी पैसे उकळले त्याच त्यांच्यासाठी वितुष्टचे कारण बनल्या आणि खटके वाढले. या प्रकरणी आता सनाकडून सातत्याने धाक दाखवून अमित लाखो रुपये उकळत होता, असा आरोप ठेवत मानकापूर पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सना खान हत्याकांडाने धक्कादायक वळण घेतले असून राजकीय क्षेत्रात लवकरच मोठा भूकंप येणार असल्याचे बोलले जाते.
भाजपा नेत्या सना खान यांची ओळख दोन वर्षांपूर्वी फेसबुकवरून जबलपूरमधील कुख्यात गुंड अमित शाहूशी झाली. त्यानंतर सना खान या मध्यप्रदेशात आयोजित भाजपाच्या एका शिबिरात गेल्या. तेथे सना खान आणि अमित शाहू यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सना यांच्या संपर्कात भाजपाचे मोठमोठे नेते असल्याचे अमितने हेरले. त्याने सना यांच्या याच जनसंपर्काचा गैरफायदा घेत पैसे लुबाडण्याचे ठरवले. विवाहित असलेल्या अमितने सना यांना लग्नाचे आमिष दाखवले. दुसरीकडे अमितला देखील मध्यप्रदेशच्या राजकारणात प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे त्याने सना खान यांचा वापर करण्याचे ठरवले. अमितने सना यांच्याशी लग्न केले. त्यानंतर सना यांना महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील राजकीय नेत्यांशी सलगी वाढवित, अवघडलेल्या स्थितीत पदाधिकाऱ्यांसोबत रात्र फोटो, व्हिडीओ काढण्यास बाध्य केले. पुढे या अश्लील चित्रफिती सोशल मीडियात टाकण्याची धमकी देऊन काहींकडून अमितने लाखो रुपये उकळले अशी माहिती आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा