सर्वर सुरळीत सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिला परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश 

0
249

छत्रपती संभाजीनगर  –Talathi Bharti तलाठी भरती प्रक्रियेमध्ये Server down सर्वर डाऊन झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर ताटकळत बसावं लागले होते. औरंगाबाद शहरातील PS College पीएस महाविद्यालयामध्ये तलाठी भरती परीक्षा आज पासून सुरू झालेली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सर्वर डाऊनचा फटका शेकडो विद्यार्थ्यांना बसला आहे. सर्वर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांचे लॉगिन होऊ शकले नाही परिणामी तब्बल अर्धा ते पाऊण तास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर थांबावे लागले. तब्बल पाऊण तासानंतर सर्वर सुरळीत सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षा रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी पूर्ण चाळीस मिनिटे देणार असल्याचे तहसीलदार अविनाश अंकुश यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा