कांद्याच्या निर्यात शुल्काला आमचा विरोध-खासदार कोल्हे

0
35

पुणे PUNE – कांद्याचे भाव वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. (Onion Price Politics) शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद केले होते. त्याचप्रमाणे या निर्णयाच्या विरोधात NCP राष्ट्रवादीच्या SHRAD PAWAR शरद पवार गटाकडून पुण्यात आंदोलन सुरु करण्यात आले. मात्र, केंद्र सरकारने कांदा खरेदीचा निर्णय घेतल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र, आता  AMOL KOLHE खासदार कोल्हे यांनी ४ हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदीची मागणी केली आहे.

खासदार कोल्हे म्हणाले की, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांसमोर कांद्याच्या निर्यातीवर लावलेल्या कराचा विषय मांडवा. मी स्वःत कांद्याचा हार घालून त्यांचा सत्कार करेन. कांदा प्रश्न जो पर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत कोणताही मंत्री गावात आला की त्या मंत्र्यांचा सत्कार कांद्याचा हार घालून करा, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी राज्यांतील सर्व शेतकऱ्यांना केले आहे. दरम्यान, या मुद्यावर राष्ट्रवादीचा शरद पवार गट आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा