कांदा उत्पादकांना दिलासा, केंद्र सरकार खरेदी करणार

0
31

मुंबई  MUMBAI : महाराष्ट्रातील  MAHARASHTRA कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा (onion) खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. कांद्याची खरेदी 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिली. फडणवीस हे सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमितशाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली व नंतर निर्णय घेण्यात आला.

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे देखील कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जपानमधून केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांच्याशी फोनवरुन संवाद साधला.

निर्यात शुल्कामुळे नाराजी

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यानंतर केंद्र सरकार 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल भावाने नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा