स्टॅलिन, खर्गेंविरुद्ध गुन्हा दाखल

0
29

रामपूर-सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांच्याविरुद्ध (FIR on Stalin, Kharge in Sanatan Issue) उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात एका वकीलाने पोलिस अधीक्षकांकडे पत्राच्या माध्यमातून तक्रार केली होती.

मागील दोन दिवसांपासून हा वाद पेटला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन आणि (Congress President Mallikarjun Kharge)काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा आणि (Priyanka Kharge, Minister for Rural and Panchayati Raj in the Government of Karnataka)कर्नाटक सरकारमधील ग्रामीण आणि पंचायती राज मंत्री प्रियांका खरगे यांनी सनातन धर्मावर भाष्य केले होते. त्याची देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. या दोन्ही नेत्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. (Udayanidhi Stalin)उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म संपवण्याचे आवाहन केले होते तर खर्गे यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. त्यांच्याविरुद्ध भादविच्या कलम १५३ अ आणि २९५ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, (BJP)भाजपने त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसवर हल्ला चढवला होता.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा