पीओपी मूर्ती, महापालिका प्रशासन कारवाई करणार

0
22

 

(Nagpur)नागपूर – नागपूरात प्रतिबंध असूनही मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्ती विकल्या जात असून महापालिका प्रशासन यावर कार्यवाही करणार असल्याचो माही मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांनी दिली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. नागपूरात श्री गणेशोत्सवाकरिता नागपूर जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळ व सेवाभावी संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली. नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, (Municipal Commissioner Abhijeet Chaudhary)मनपा आयुक्त अभिजीत चौधरी,  (Collector Vipin Itankar)जिल्हाधिकारी विपीन इटनकर,
यांच्या विशेष उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत सांगण्यात आले की यावर्षी नागपूर जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळ यांना ऑनलाइन परमिशन मिळेल. त्यासाठी वेबसाईट पण तयार करण्यात आली आहे. सोबतच यावर्षीपासून महाराष्ट्र राज्याकडून गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या बैठकीत सांगितले की नागपूर पोलीस गणेशोत्सवासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. लाऊडस्पीकरची परवानगी रात्री 10 वाजेपर्यंत असून काही दिवस ही परवानगी 12 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा