
-मुधोजी भोसले (Mudhoji Bhosale)
(Nagpur)नागपूर: मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर समान नागरी कायदा करुन सर्वांना समान पातळीवर आणा, अशी मागणी नागपूरकर भोसल्यांचे वंशज मुधोजीराजे भोसले यांनी एका वाहिनीशी बोलताना केली आहे. (Mudhoji Raje Bhosale) म्हणाले. या संदर्भात आपण राज्यातील मराठा संघटनांची चर्चा करुन त्यांची समजूत काढू, असेही ते म्हणाले. जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील प्रकार दुर्दैवी होता आणि आरक्षणासाठी मराठा समाज पूर्वीपासून एकजूट होऊन काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भोसले म्हणाले, राजघराणे, उद्योजक यांना आरक्षण नकोय. पण समाजातील इतरांना नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षण हवे आहे. आम्हाला राजकीय आरक्षण नकोच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जर सरकारला ते द्यायचे नसेल तर सरकारने समान नागरी कायदा करावा आणि सर्वांना समान पातळीवर आणावे. एकदा समान नागरी कायदा लागू झाला तर प्रत्येकाला आपापल्या क्षमतेप्रमाणे शिक्षण आणि नोकरी मिळू द्यावी, असे भोसले म्हणाले.
