आरक्षणासाठी वंशावळीची अट नको

0
43

(Jalna)जालना-निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. (Maratha Reservation Issue) त्यांच्या घोषणेनंतर आता जरांगे यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले असून ते आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि त्यासाठी वंशावळीची कुठलीही अट ठेवू नये, अशी मागणी त्यांनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही सुधारणा करेपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

वंशावळीचे दस्ताऐवज अनेक लोंकाकडे नाहीत. तर वंशावळीची अट ठेवू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारचा निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, पण त्यामध्ये थोडा बदल करण्यात यावा, सरकारने तो बदल करून घ्यावा आम्ही निर्णय घेतो, असेही जरांगे म्हणाले.

मागील दहा दिवसांपासून उपोषण व आंदोलन सुरु आहे. गुरुवारीही अनेक ठिकाणी बंदची घोषणा करण्यात आल्याने मराठवाड्यात अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले असल्याची माहिती आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा