पाच दिवसात 31 लाखांच्या 107 वीजचो-या उघड

0
29

 

(Nagpur)नागपूर -महावितरणच्या नागपूर शहर मंडलांतर्गत वीजचोरीविरोधात संचालन व सुव्यवस्था आणि भरारी पथकांकडून संयुक्त मोहिमेत पाच दिवसांत भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये सुमारे 31.65 लाखांच्या 107 वीजचो-या उघडकीस आल्या आहेत. याशिवाय कलम 126 अन्वये सुमारे 1.3 लाख मुल्याच्या 5 ठिकाणी वीज वापरातील अनियमितता आढळून आली आहे.

नागपूर शहरातील सिव्हिल लाइन्स विभागातील संघर्ष नगर. लश्करीबाग व यशोधरा नगर, महाल विभागातील  ताजबाग व हसनबाग, गांधीबाग विभागातील मोमीनपुरा व अन्सार नगर आणि खोग्रेसनगर विभागातील (Jayatala)जयताळा, (Hudkeshwar)हुडकेश्वर या भागातील वीज हानी अधिक असलेल्या वाहिन्यांवर ही मोहीम कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आली. महावितरणचे प्रदेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात आणि नागपूर परिमंडलाचे (Chief Engineer Dilip Dodke) मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे (Amit Paranjape, Superintendent Engineer, Nagpur City Division)यांच्या नेतृत्वात या (Rajesh Ghatole, Executive Engineer of the Department) विभागाचे कार्यकारी अभियंता रजेश घाटोले, (Sameer Tekade)समीर टेकाडे, (Rahul Jivtode)राहुल जीवतोडे आणि (Hemraj Dhoke)हेमराज ढोके यांच्यासह या भागातील उपविभागातील सर्व अतिरिक्त कार्यकारी अभियंते आणि सहायक अभियंते आणि त्यांचे तांत्रिक कर्मचा-यांनी सहकार्य केले ही मोहीम अधिक आक्रमक करणार असल्याची माहिती मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा