
पाच एकांकिका होणार सादर
(Nagpur)नागपूर, 6 सप्टेंबर
(Government of India Ministry of Culture)भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय, (New Delhi and theatre)नवी दिल्ली व रंगभूमी, नागपूर यांच्या संयुक्त वतीने मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 रोजी पंचम नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाच एकांकिकांचे सादरीकरण केले जाणार आहे.
इटीईश्री आर्ट अकॅडमी निर्मित लेखक व दिग्दर्शक डॉ. पराग घोंगे यांच्या ‘परमेश्वरलोक डॉट कॉम’ या एकांकिकेने महोत्सवाला प्रारंभ होईल. त्यानंतर अंभृणी सेवा संस्था निर्मित लेखक व दिग्दर्शक स्वप्निल बोहटे यांची ‘दिव्यदान’ ही एकांकिका सादर केली जाणार आहे. नारायणा विद्यालयम निर्मित (Shubhangi Dongre) शुभांगी डोंगरे अनुवादित व (Rekha Rahate)रेखा रहाटे यांनी दिग्दर्शित केलेली ‘ऑथेलो’, तांडव क्रिएशनची (Chaitanya Sardeshpande)चैतन्य सरदेशपांडे लिखित व अभिषेक बेल्लावार दिग्दर्शित ‘उकळी’ आणि अभिनय संस्थेची (Vijay Tendulkar)विजय तेंडुलकर लिखित व विनोद काळे दिग्दर्शित ‘सफर’ ही एकांकिका महोत्सवात सादर केली जाणार आहे.

रात्री 10 वाजता होणा-या समारोपीय कार्यक्रमात (Veteran actor Vinod Kulkarni) ज्येष्ठ नाट्यकर्मी विनोद कुळकर्णी यांचा सत्कार केला जाणार आहे. नागपूरच्या संकल्प बहुउद्देशीय संस्था, रशुद्धी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था, प्रदूषण नियंत्रण नागरी स्वास्थ्य संवर्धन बहुउद्देशीय संस्था व रुखमाई सेवा मंडळ यांच्यासह कुहीच्या साई सर्वांगीण ग्रामीण समाज विकास संस्थेचा या नाट्य महोत्सवात सहभाग आहे. नाट्य महोत्सवाचा मोठ्या संख्येने आनंद घ्यावा, असे आवाहन पंचम नाट्य महोत्सवाचे आयोजन (Amit Kubde)अमित कुबडे व रंगभूमी (President of Nagpur Vilas Kubde)नागपूरचे अध्यक्ष विलास कुबडे यांनी केले आहे.