शिवरायांची वाघनखं मायदेशी येणार!

0
46

 

शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात परत येणार

(Mumbai)मुंबई : (Chhatrapati Shivaji Maharaj)छत्रपती शिवाजी महाराजांनी (Afzal Khan)अफजल खानाचा वध करण्यासाठी ज्या वाघनखांचा वापर केला, ती भारतात आणली जाणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती (State Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यासंदर्भात लंडनमधील संग्रहालयाशी सामंजस्य करार होणार असून नोव्हेंबरमध्ये ही वाघनखं महाराष्ट्रात येतील, अशी अपेक्षा असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. स्वतः मुनगंटीवार यांनीच यासाठी पुढाकार घेतला आहे.

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी यासंदर्भात माहिती दिली की, यासंदर्भात ब्रिटनच्या अधिकाऱ्यांचे एक पत्र मिळाले आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक वाघनख पुन्हा भारताकडे सुपूर्द करण्याचा विचार केला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हिंदू तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफजल खानाचा वध केला होता, त्याच दिवशी ती वाघनखं भारताला परत करणार असल्याचेही ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात या महिन्याच्या अखेरीज (Victoria)व्हिकोरिया आणि (Albert Museum)अल्बर्ट संग्रहालयसोबत सामंजस्य करार करण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे (Principal Secretary of Cultural Affairs Department Dr. Vikas Kharge) सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. विकास खारगे, (Director of State Archeology and Museum Dr. Tejas Garg)राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्ग यांना घेऊन लंडनला रवाना होणार आहेत. करार झाल्यानंतर ऐतिहासिक वाघनखं मायभूमीत येण्याचा मार्ग मोकळा होईल. सामंजस्य करारावर सही करण्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि इतर ऐतिहासिक वस्तूही भारतात परत आणण्याचा विचार आम्ही करत आहोत, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना मुनगंटीवार म्हणाले की, ज्या वाघ नखांनी अफजल खानाचा वध केला होता, ती वाघनखं भारतीयांसाठी नेहमीच अभिमानाची बाब राहिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं (British Prime Minister Rishi Sunak) ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी (Prime Minister Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतः सोपवावी, असे आमचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा