समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही

0
22

– विजय वडेट्टीवार  (Vijay Vadettiwar)

(Amravti)अमरावती– 2014 मध्ये भाजप सरकारने धनगर आरक्षणाचे आश्वासन दिले होते. पण ते पूर्ण केले नाही. धनगर समाजाची मतं घेतली, त्यांना फसवण्याचं काम केलं, कुठल्याही समाजाला फसवत असाल तर समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा (Leader of Opposition Vijay Wadettiwar)विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाविषयीचा जो जीआर आता काढला तो जुनाच जीआर आहे. जुनी बाटली नवा लेबल आहे. कुठल्याही समाजाला कुठलेही प्रमाणपत्र द्यायचे असेल तर त्याला तीन पिढ्यांच्या वंशावळीचा दाखल्याची गरज असते. त्यामुळे हा जीआर पूर्वी सुद्धा काढला होता, यात काहीही नवीन नाही. वंशावळमध्ये जो बसेल त्याला मिळेल. हे सर्व समाजासाठी आहे केवळ मराठा, कुणबी समाजासाठी नाही. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे काही रॅकेट असेल तर ते शोधून काढणे सरकारचे काम आहे. जनतेने सावधान रहायला पाहिजे. लोकांनी अशा बनवाबनवी करणाऱ्या लोकांपासून सावधान राहावं. खोटं प्रमाणपत्र पुढे टिकणार नाही. पंकजा मुंडे यांची यात्रा ही धार्मिक यात्रा देवदर्शनाची यात्रा आहे. देव पावल्यानंतर ताई कुठल्या दिशेने जातील हे त्यांना देव सद्बुद्धी देवो अशी सदिच्छा व्यक्त केली.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा