
वाहतुकीचा मार्ग बंद
(Wardha)वर्धा – वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नदी, नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कानगाव ते अलमडोह मार्ग बंद झाला असून वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर ते कानगावलगत असणाऱ्या (Yashoda River) यशोदा नदीला पूर आला आहे. गावकऱ्यांना या पुलावरून जाण्या येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हा पूल अतिशय कमी उंचीचा असल्याने पावसामुळे ह्या नदीला पूर येत असून तेच पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाते, त्यामुळे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हा पूल दुरुस्त करून त्या पुलाची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. फसवत असाल तर समाज तुम्हाला
