
हजारो लोकांनी वाहिली श्रद्धांजली
(gondia)गोंदिया – भारत मातेच्या सेवेसाठी लेह-लडाख येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तुमखेडा येथील जवानाला हृदयविकाराच्या धक्क्याने वीरमरण आले. (Suresh Huklal)सुरेश हुकलाल नागपुरे 33 वर्षीय असे शहिद जवानाचे नाव आहे. ही माहिती मिळताच तुमखेडासह गोंदिया तालुक्यात एकच शोककळा पसरली. आज या वीर जवानाचे पार्थिव गोंदिया शहरात आले असता हजारो लोकांनी येऊन श्रद्धांजली दिली. सुरेश हुकलाल नागपुरे हा जवान 2007 या वर्षी भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. लेह-लडाख येथे कर्तव्यावर असताना अचानक हृदयविकाराने जवान सुरेश नागपुरे याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नागपूरे कुटूंबियासह गाव व परिसरात एकच शोककळा पसरली.