
(Buldhana)बुलडाणा – बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातील (Anjani) अंजनी गावाजवळ ही ट्रॅव्हल्स उलटली असून यामध्ये झालेल्या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. पुण्यावरून साधारण 30 प्रवासी घेऊन ही बस अमरावतीकडे जात होती.
अंजनी गावाजवळ समोरून ट्रक आडवा आल्याने या खाजगी ट्रॅव्हल्स चा अपघात झाला असल्याच सांगितलं जात आहे. या यावेळी गावकऱ्यांनी तात्काळ मदतकार्य करत अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स मधून जखमींना बाहेर काढले आणि तात्काळ त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या अपघाताचा मुद्दा ह्या अपघाताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रवाशांचे जीव धोक्यात घालून खाजगी ट्रॅव्हल्स बेभानपणे रस्त्यावर वाहन चालवताना पहायला मिळत आहे.
