
(Nagpur)नागपूर, 9 सप्टेंबर
अमृत प्रतिष्ठानचा २४ वा वर्धापन दिनानिमित्त संगीत कलानिधी यांच्या संयुक्त विद्यमाने ( P. Vishnu Narayan Bhatkhande)कै. पं. विष्णू नारायण भातखंडे, (Dr. Srikrishna Narayan Ratanjankar) कै. डॉ. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर व (Sangeetacharya Late. Pt.Amritrao Nistane) संगीताचार्य कै. पं. अमृतराव निस्ताने यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संगीत सोहळ्यात हृषीकेश करमरकर यांचे सुरेख दिलरुबा वादन तसेच चेतन बालपांडे यांच्या गायनाने मैफलीत रंगत आणली. दिलरुबाचे माधुर्य व गायकाच्या सुरांचे हिंदोळे यांची संगीत प्रेमींनी अनुभूती घेतली.
पहिल्या सत्रात (Hrishikesh Karamarkar)हृषीकेश करमरकर यांनी दिलरुबावर राग पुरीया कल्याण सादर केली व त्यानंतर त्यांच्या गुरुची बंदिश अतिशय सुरेख पद्धतीने सादर करुन रसिकांची दाद मिळविली. आपल्या प्रस्तुतीचे समापन त्यांनी राजस्थानी लोक गीताने केले. त्यांना तबल्यावर राम खडसे यांनी तर तानपु-यावर निधी रानडे यांनी समर्पक साथ दिली. दुस-या सत्रात पुणे येथील (Pt.Nagesh Adgaonkar)पं. नागेश अडगावकर यांचे शिष्य (Chetan Balpande)चेतन बालपांडे यांनी सुरुवातीला राग श्री मधे बिलंबित व नंतर मध्यलयीत बंदीश सादर केली. “याद पिया की आये” ठुमरी, गझल प्रस्तुती नंतर (Chetan Balpande ) यांनी लिहिलेल्या व (Moreshwar Nistane) मोरेश्वर निस्ताने यांनी संगीतबद्ध केलेल्या भैरवीने त्यांनी आपल्या गायनाचे समापन केले. त्यांना संवादिनीवर (Srikant Pise)श्रीकांत पिसे यांनी तर तबल्यावर मुंबईचे (Pawan Sidam) पवन सिडाम तसेच तानपु-यावर (Shubham Jambhulkar)शुभम जांभुळकर व (Pratik Mhaiskar)प्रतीक म्हैसकर यांनी यांनी उत्कृष्ठ साथ दिली.

(Excellent conduct of the concert by Arya Ghatwai)मैफलीचे उत्कृष्ट संचालन आर्या घटवाई यांनी केले. (Mohan Nistane, president of the organization)संस्थेचे अध्यक्ष मोहन निस्ताने ह्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ गायक व कलावंत व रसिक श्रोते (Kalyani Deshmukh)कल्याणी देशमुख, (Manjusri Soman)मंजुश्री सोमण, वसंत पत्थे, दत्तोपंत काशीकर, (Dr. Sudhakar Dhabadgaonkar)डॉ.सुधाकर धबडगावकर, यशोधन कानडे, श्रीराम शास्त्रकार, मोरेश्वर निस्ताने,मल्हार पुरोहित,माधुरिका गडकरी, श्रीराम शास्त्रकार, तसेच विद्यार्थी व रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नारायण राऊत, हर्षल निस्ताने व विनोद अग्रवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.