भाजपनेते अरविंद शहापूरकर यांचं निधन

0
58

(NAGPUR)नागपूर :  (Senior BJP leader and former Vidarbha Divisional Union Minister Arvind Shahapurkar)भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विदर्भाचे माजी विभाग संघटन मंत्री अरविंद शहापूरकर यांचे शुक्रवारी रात्री एम्स रुग्णालयात निधन झाले. शहापूरकर हे काही दिवसांपूर्वी एका अपघातात जखमी झाले होते व त्यात त्यांच्या मेंदूला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत कुठलीच सुधारणा झाली नाही. शुक्रवारी रात्री त्यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. शहापूरकर यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. विदर्भात भाजपचे संघटन मजबूत करणारा समर्पित असा संघटक पक्षाने गमावल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

जनसंघ किंवा भाजपचा फारसा प्रभाव नसतानाच्या काळात शहापूरकर यांनी भाजपचे कार्य वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी अत्यंत स्नेहानं वागणारा नेता म्हणून ते परिचित होते. बऱ्याच वर्षांपासून प्रकृती साथ देत नसल्याने ते पक्षात पूर्वीसारखे सक्रीय नव्हते. अंबाझरी घाटावर दुपारी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा