आमदार अपात्रतेच्या मुद्यावरील सुनावणी १४ पासून सुरु होणार

0
38

(Mumbai)मुंबई-शिवसेनेच्या आमदारांना अपात्र करण्याची याचिका (Assembly Speaker Rahul Narvekar) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विचाराधीन असताना या याचिकेवरील सुनावणी येत्या १४ तारखेपासून सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ही सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवण्यास सुरुवात झाली असून शिवसेना शिंदे गटातील ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती विधिमंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांना सुनावणीत सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. तसेच अपात्रतेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी युक्तीवादही करावा लागणार आहे. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले. (Shivsena)शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपविले. आता या प्रकरणात नार्वेकर हेच निर्णय घेणार आहेत.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा