फडणवीस विरोधकांना झाले काय, पवारांचा खोलात पाय :

0
61

 

दोघा बाप लेकींमधला फरक, फडणवीस जपानवरून परतल्यानंतर त्यांना आधी त्यांच्या लेकीने दिविजाने ओवळले त्यानंतर बाप लेकिने एकमेकांना प्रेमाने आदराने आपुलकीने कवटाळले, अख्य्या जगातल्या फडणवीस प्रेमींच्या डोळ्यातून तो व्हिडीओ बघून आनंदाश्रू आले आणि ज्या (Sharad Pawar)शरद पवार आणि (Supriya Sule)सुप्रिया या बापलेकीने विशेषतः बापाने लेकीसाठी आयुष्यभर नको तेवढ्या संपत्तीला कवटाळले, पवार आणि फडणवीस मधला हा वृत्तीतला फरक क्षणार्धात लक्षात येतो, सत्तेत फडणवीसांना कमविण्याची मोठी संधी उपलब्ध असतांना त्यांनी केवळ जनतेसाठी सारे काही कमावले आणि राष्ट्राला अर्पण करून फडणवीस मोकळे झाले मोकळे होतात.

त्यांनी डोळ्यात मावणार नाही नागपुरात एवढे भव्य दिव्य कर्करोग निदान करणारे इस्पितळ उभे करून ते बाजूला झाले कारण सारे काही केवळ राष्ट्रासाठी, दिविजासाठी किंवा स्वतःसाठी त्यातले काहीही नाही, समृद्धी महामार्ग उभारला पण या महामार्गावर (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्या किंवा नातलगांच्या नावाने फुटकी कवडी देखील नाही म्हणजे मला तर त्या भोकरधन परिसरातल्या पेट्रोल पंपाच्या नेमक्या मालकीपासून तर समृद्धीवर कुठे कोणाची किती जमीन आणि कोणी किती हात धुवून घेतले याची इत्यंभूत पुराव्यांसहित माहिती असल्याने त्यात देवेंद्र कुठेही नाहीत बघून माझे दोन्ही कर आपोआप जोडल्या गेले किंवा कोकणातल्या नाणारचे देखील तेच, तेथल्या जमिनी एकाच्या नावावर आणि मालक नेमके कोण कोण, सारे काही मला तपशीलवार माहित असते आहे विशेष म्हणजे समृद्धी, नाणार, मेट्रो इत्यादी प्रत्येक ठिकाणी दरोडा घालणारे अनेकदा माझ्या शेजारीच बसून गप्पा मारत असतात, पण त्यात फडणवीस कुठेही नाहीत नसतात म्हणून त्यांना जवळून ओळखणारे त्यांच्यासमोर मनापासून नतमस्तक होतात.

शरद पवार ज्या खालच्या पातळीवर येऊन देवेंद्र फडणवीसांना सतत आव्हान देतात त्रास देतात विशेषतः या मराठा आंदोलनाच्या निमित्ताने तर पवारांनी वागण्याची आणि राजकारण खेळण्याची एकदम खालची पातळी गाठली त्या मराठ्यांना हे का कळत नाही कि पवारांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठयांना मोठे केले आणि कायम मराठवाडा खान्देश किंवा विदर्भातल्या मराठ्यांना तत्सम मराठा उपजातींना फाट्यावर मारले अडगळीत ठेवले थोडक्यात विकासापासून त्यांना कोसो दूर ठेवले म्हणूनच आमच्या विदर्भातले अपवाद वगळता बहुसंख्य नेते कायम सतत शरद पवार यांच्यापासून दूर राहिले त्यांनी पवारांना कधीही आपला नेता मानले नाही किंवा त्यांच्याकडे कधीही आदराने बघितले नाही, एखादा पुढे जात असेल तर त्याचा कसा (Sudhakarrao Naik)सुधाकरराव नाईक किंवा (Shankarao Chavan)शंकरराव चव्हाण करून मोकळे व्हायचे आणि विदर्भ मराठवाड्याला कसे सावत्र मुलांसारखे हिडीसफिडीस करायचे हे येथल्या स्थानिकांनी सतत बघितलेले असतांना ज्याच्या डोक्यात केवळ विकासाच्या कल्पना आहेत त्या फडणवीसांना केवळ शरद पवारांच्या सांगण्यावरून सूचनांवरून जर चुकीच्या पद्धतीने मराठा आंदोलनात फडणवीसांची केवळ एक बामन म्हणून बदनामी केल्या जात असेल तर पुन्हा एकवार विकासाच्या योजना केवळ कागदावर उरतील आणि पवार संस्कारित चुकीचे नेते केवळ स्वतःची घरे भरून मोकळे
होतील…

(Hemant Joshi, Mumbai)हेमंत जोशी, मुंबई

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा