ओबीसी क्रांति मोर्च्याच्या अध्यक्षाला अटक

0
131

 

Bhandara OBC Kranti Morcha News : भंडारा ओबीसी क्रांति मोर्च्याचा इशारा नंतर अखेर ओबीसी क्रांति मोर्च्या अध्यक्ष संजय मते सह पदाधिकाऱ्याला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे.राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे आज (ता. १०) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी उद्योगमंत्र्यांना ओबीसी क्रांति मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याची तयारी केली होती. (The tension between the district administration and the Bhandara police department has increased again.)ही बाब लक्षात घेता भंडारा शहर पोलिसांनी संजय मते ,जिल्हा उपाध्यक्ष श्याम कांबळे व सदस्य अमर भूरे यांना त्यांच्या कार्यालयातुन अटक केली आहे.

शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करत कुणबी समाजाचे दाखले देण्याची भूमिका आहे. याविरोधात भंडाऱ्यात येणाऱ्या मंत्री उदय सावंत यांना ओबीसी क्रांती मोर्चा त्यांना काळे झेंडे दाखवत आपला रोष व्यक्त करणार होते, अशी माहिती ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सकाळी दिली होती. दरम्यान सरकारनामाने ही बातमी प्रकाशित करताच भंडारा पोलिस प्रशासन खळबळून जागे होत सुरक्षतेच्या दृष्टिने संजय मते यांना पदाधिकारी सोबत ताब्यात घेतले आहे.विशेष म्हणजे मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण दिल्यास वैनगंगा नदीत उडी घेऊन सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा ओबीसी क्रांती मोर्चाकडून याआधीच देण्यात आला आहे. या संघटनेने शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या विरोधात एलगार पुकारल्याचे दिसत आहे. आता पुन्हा मंत्रालाच काळे झेंडे दाखविनार असल्याच्या इशाऱ्याने भंडारा पोलीस विभागासह जिल्हा प्रशासनाचे पुन्हा टेंशन वाढल्याने ही अटक करण्यात आल्याचे बोलले गेले आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून मराठा नेते मनोज जरांगे यांनी जालन्यात आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची खालावत चाललेली प्रकृती व मराठ्यांच्या सुटत असलेला संयम पाहता सरकारवर अधिक दबाव वाढत चालता आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. पण त्यात यश येताना दिसत नाही.दरम्यान मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी केल्यानंतर ओबीसी पेटून उठला आहे.दूसरी कड़े राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी या निर्णयाला आधीच विरोध केला आहे. आता यामध्ये भंडारा (Bhandara) ओबीसी क्रांती मोर्चाने उडी घेतली. मराठा समाजाला ओबीसीत त्यातही कुणबी समाजात समाविष्ट केल्यास सर्व ओबीसी (OBC) क्रांती मोर्चाचे पदाधिकारी वैनगंगा नदीत उडी घेऊन सामूहिक आत्महत्या करणार असल्याच्या निर्धार केला होता. यात भर म्हणून की काय आज भंडारा जिल्ह्यात येणाऱ्या उद्योग मंत्री उदय सामंत यांना ओबीसी क्रांती मोर्चा काळे झेंडे दाखविले जाणार होते.मात्र पोलिसांच्या कारवाई नंतर शक्यता कमी झाली आहे.

तिकडे मराठा नेते मनोज जरांगे यांचे सुरू असलेले आमरण उपोषण, इकडे ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा नंतर मंत्राना काळे झेंडे दाखविण्याचा दिलेला इशारा, यामुळे भंडारा जिल्हा प्रशासन आणखी पेचात पडले आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचा वाढता विरोध अद्याप तरि संपन्याचे चिन्ह दिसत नाही आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा