
मंदिरात ८०० पेक्षा अधिक दिव्यांची मनमोहक आरास
नागपूर : शनिवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ रोजी पंचमुखी हनुमान मंदिर, बेल्लोरी, बाबुलखेडा, नागपूर येथे विशेष पूजा आणि १०१ किलो बुंदी लाडू व महाप्रसाद वितरण तसेच महाआरतीचे आयोजन रोहित अतकरे (निवेदक) आणि मित्र परिवारातर्फे करण्यात आले.

यावेळी मंदिरात ८०० पेक्षा अधिक दिव्यांची आरास करण्यात आली होती. पहाटे ०४:४५ वाजता श्री हनुमान मूर्तीवर विधिवत मंगल अभिषेक करण्यात आला त्यानंतर संपन्न झालेल्या महाआरतीला १२०० पेक्षा अधिक भाविक उपस्थित होते. तसेच यानंतर सर्व भाविक भक्तांनी १०१ किलो बुंदी लाडू वितरण आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन श्री. पंचमुखी हनुमान मंदिर, बेल्लारी, बाबुलखेडा, नागपूर आणि निवेदक रोहित अतकरे व मित्र परिवार यांच्यातर्फे करण्यात आले. करनेवाले हनुमानजी आणि करानेवाले भी हनुमानजी अशी भावना या कार्यक्रमप्रसंगी आयोजकांनी व्यक्त केली.