
Sana Khan Murder Case : नागपुरातील भाजपच्या नेत्या सना खान (Sana Khan Murder) यांच्या हत्याप्रकरणात आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपुरातील सना खान हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट (Murder Mystery) आलाय. गेल्या महिन्यात पोलिसांना सना खान यांच्याशी मिळताजुळता एक मृतदेह जबलपूरमध्ये (Jabalpur) आढळून आला होता. या मृतदेहाची डीएनए चाचणीचा (DNA Test) अहवाल आता आला असून त्यात निगेटिव्ह रीमार्क देण्यात आलाय. त्यामुळे तो मृतदेह सना खानचा नसल्याचे आता डीएनए रिपोर्टमुळे स्पष्ट झालंय. त्यामुळे आता पोलिसांचं (Nagpur Police) टेन्शन वाढल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता खुनाचा छडा लागणार तरी कधी? असा सवाल विचारला जात आहे.
एक महिना उलटून गेला तरी अद्याप सना खानचा मृतदेह (Sana Khan Murder Case) हाती लागलेला नाही. आरोपी अमित शाहूच्या घरातील सोफ्यामध्ये सापडलेले रक्ताचे डाग सापडले होते. जबलपूर येथील सोफ्यावरील रक्ताचे डाग हे सना खान यांचेच असल्याचे डीएनए चाचणीत स्पष्ट झालंय. सना खान यांचा 2 ऑगस्टला आरोपी अमित साहू याने खून केला आणि तिचा मृतदेह हिरण नदी फेकला. त्यानंतर पोलिसांनी चौफेर चाचपणी केली मात्र, अद्याप मृतदेह हाती लागला नाहीये.
