
अहमदनगर : दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अहमदनगर (Ahamednagar) दौऱ्यावर आहेत. कोपरगावच्या काकडी गावात ठाकरेंनी शेतीचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांशी (Farmers) संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे व्यथा मांडल्या. त्यानंतर संगमनेरच्या वडझरी गावात शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली..त्यावेळी शेतकऱ्यांनी पाढाच वाचला. .शासन आपल्या दारी ही फसवी योजना असून, सरकारचं आमच्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तर मदत मिळते का वाट पाहू, नाहीतर आंदोलन करू असा इशारा ठाकरेंनी सरकारला दिलाय.
या सरकारकडे पक्ष फोडण्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयांची मदत करा, शेतकऱ्यांचं वीजबिल सरकारने माफ करावं अशा मागण्या उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली.
