
गोंदिया GONDIYA – भाजपा BJP सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकते ज्यावेळी पुलगामासारखे घटना झाली त्यावेळी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मलिक यांनी प्रधानमंत्री NAREDRA MODI नरेंद्र मोदी यांना फोन करून याविषयी माहिती दिली होती. परंतु देशाचे पंतप्रधान त्यावेळेस जंगलामध्ये फोटो काढण्यात व्यस्त होते. त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. सत्तेत येण्यासाठी मोदी सैनिकांचा सुद्धा वापर करू शकतात. त्यामुळे श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी अशा घटना घडू शकतात. सध्या उत्तर प्रदेश मध्ये भाजपाचे सरकार आहे आणि केंद्रात सुद्धा आहे. भगवान श्रीरामाच्या नावाने लोकांना मते मागून भाजपा सत्तेत आली मात्र हे खोटं बोलतात असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष NANA PATOLE नाना पटोले यांनी केला आहे.
त्यामुळे श्रीरामाच्या मंदिराची सुरक्षा वाढविली पाहिजे जेणेकरून असा कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकडे लक्ष वेधले. एस टी संप संदर्भात बोलताना
आमचे सरकार असताना भाजपावाल्यांनी या एसटी कामगारांना प्रलोभन देऊन आंदोलन करायला लावले. त्यावेळी लोकांची गैरसोय झाली. आज यांचे सरकार येऊन दीड वर्षे झाली पण साधे यांचे पगारही दिले नाही. आज लालपरी ग्रामीण भागात जीवनवहिनी होती ती आता बंद व्हायला आली आहे. कॉंग्रेस काळात एसटी बसेसला चांगले दिवस आले होते. भाजप सरकार आल्यापासून एसटी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे की एसटी बसेस छत्री घेऊन चालवतानाचे चित्र दिसत आहे. एका अर्थाने महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम भाजप शिंदे सरकार करीत आहे. एसटी कामगारांच्या मागण्याही या रास्त आहेत. परंतु भाजप सरकार सत्तेत आल्यावर एसटी कामगारांचे प्रश्न बाजूला सारते.
प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडीबाबत आतापर्यंत वंचित आघाडीकडून कोणताही असा प्रस्ताव आलेला नाही. जे कुणी भाजपाच्या विरोधात असतील अशा लोकांना इंडियामध्ये सामील करून घेण्यास आमची कोणतीही हरकत नाही तसा प्रस्ताव त्यांनी द्यावा कारण सध्या भाजपा सरकार काही निवडक लोकांचेच पोट भरीत आहे आणि अशावेळी भाजपाच्या विरुद्ध जर कोणी आमच्यासोबत येत असेल त्यांचे स्वागतच आहे, तसा त्यांनी प्रस्ताव आम्हाला द्यावा निश्चितपणे यावेळेस आपण त्यांना सामील करण्याबाबत निर्णय घेऊ असे पटोले म्हणाले.
