
नागपूर- नागपुरात संविधान चौक येथे सुरू असलेल्या कुणबी -ओबीसी कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाना भेट दिल्यानंतर संसदेत बिल आणून ,सीमा वाढवून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ANIL DESHMUKH माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मांडली.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला शासनाने धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे यावर भर दिला.
हा तिढा सोडवायचा असेल तर शरद पवारांच्या म्हणण्य़ाप्रमाणे लवकरात लवकर संसदेत बिल आणून आरक्षण सीमा वाढवून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर प्रश्न सुटू शकतो. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, लवकरात लवकर यासंदर्भात विचार करुन निर्णय घेतला तर चांगला संदेश समाजात जाईल, सरकारने दोन समाजात भांडणं लावू नये, दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं असेल तर तशी त्यांनी कृती केली पाहिजे, लवकर निर्णय घेतला तर तिढा सुटू शकतो. आमच्या ओरिजनल राष्ट्रवादी पक्षातून जे नेते दूर गेले त्यांना पक्षातर्फे नोटीस दिली गेली आहे. इलेक्शन कमिशन नियम- अटी पाहून निर्णय घेईल, आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. आजवर चुकीने गेले त्यांनी परत यावे हा प्रयत्न होता.मात्र, ते परत न आल्याने पुढील प्रक्रिय़ा सुरू केली आहे असे देशमुख एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
