रक्‍तदान शिबिराला उत्‍स्फूर्त प्रतिसाद

0
104

नागपूर, 11 सप्‍टेंबर
स्‍वामी विवेकानंदांनी शिकागो येथील विश्‍व धर्म संमेलनात 11 सप्‍टेंबर रोजी जगप्रसिद्ध व्‍याख्‍यान दिले होते. त्‍या स्‍मृतींना उजाळा देण्‍यासाठी रामकृष्‍ण मठ धंतोली येथील स्‍वामी विवेकानंद चॅरिटेबल मल्‍टीथेरपी डिस्‍पेंसरीच्‍यावतीने बुधवारी रक्‍तदान शिबिर घेण्‍यात आले. विवेकानंद विद्यार्थी भवनच्‍या विद्यार्थ्‍यांनी शिबिराला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद देत रक्‍तदान केले.
उद्योजक हरीष कोठारी व शश‍िकांत स‍िंघानिया तसेच, रामकृष्ण मठाचे स्वामी महाबलानंद, डॉ. रावत, डॉ. विरल कामदार, डॉ. कळमकर, डॉ. बत्रा इत्यादी उपस्थित होते. शिबिरातून संकलित झालेले रक्‍त शासकीय वैद्यकीय रुग्‍णालयातील गरीब व गरजू रुग्‍णांना मोफत उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे. शिबिराच्‍या यशस्‍वीतेसाठी डॉ. सुमीत चाहाकर, डॉ. संजय चव्‍हाण, अदिती कामदार, आशीष पवार, गीता साहू आदींचे सहकार्य लाभले.
‘शिवभावे जीवसेवा’ या ब्रिदानुसार स्‍वामी विवेकानंद चॅरिटेबल मल्‍टीथेरपी डिस्‍पेंसरीद्वारे गरीब व गरजू रुग्‍णांना अॅलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेदिक वैद्यकीय सेवा अल्‍पदरात उपलब्‍ध करून दिल्‍या जातात. दंतरोग, त्‍वचारोग आदीवर उपचार करण्‍यासाठी येथे अत्‍याधुनिक उपकरणांद्वारे रुग्‍णांवर उपचार केले जातात.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा