बुधवारपासून पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज

0
33

मुंबई- सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्यावर आता पुन्हा एकदा पावसाने दोन ते तीन दिवसांची विश्रांती घेतली आहे. मात्र, आता बुधवारपासून पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने पावसाची तूट भरुन निघण्याची आशा निर्माण झाली आहे. बुधवारपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. पहिल्या आठवड्यातील जोमदार पावसामुळे राज्यातील बहुतांशी भागात पिकांना जीवदान मिळाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये धरणे भरली आहेत. आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, याच आठवड्यात सुरु होणाऱ्या पावसामुळे तूट भरून निघण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा