हजारोंच्या उपस्थितीमध्ये कावड यात्रा

0
22

 

अकोला- SHRAWAN MAHINA श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी बुलढाणा जिल्ह्यातील शहरातून भव्य KAWAD YATRA  कावड यात्रा निघाली. कावड यात्रा उत्सवाला शहरात वर्षागणिक भव्य-दिव्य स्वरूप येत आहे. शहरातून निघालेल्या कावडयात्रेत अनेक कावडधारी मंडळ सहभागी झाले होते. ‘हर बोला महादेव’ च्या गजराने अवघे शहर दणाणून गेले होते. श्रावण महिना हिंदू संस्कृतीत अतिशय पवित्र मानला जातो. श्रावणातील सोमवारला विशेष महत्व असून सोमवारी शिवपिंडीला पवित्र जलाव्दारे अभिषेक घालण्याची परंपरा आहे. त्यामुळे प्रत्येक श्रावण सोमवारी शिवभक्त कावडधारी वेगवेगळ्या तीर्थस्थळावरून पवित्र जल आणून शिवमंदिरात जलाभिषेक करीत असतात. आज या महिन्याचा शेवटचा सोमवार असल्यामुळे शहरात कावड यात्रा महोत्सवाला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. Kavad Yatra in the presence of thousands 

उत्सवांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरात या कावड यात्रा उत्सवाला भव्य-दिव्य स्वरूप येताना दिसत आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी शहरातील विविध मंडळांचे शेकडो कावडधारी तीर्थस्थळांवरून खांद्यावर कावड घेऊन जल आणत असतात. आज शेवटचा सोमवार असून कावडधारींनी वेगवेगळ्या ठिकाणावरून आणलेल्या पवित्र जलाद्वारे पहाटेच शिवमंदिरांमध्ये जलाभिषेक केला. त्यानंतर वाजत-गाजत कावडधारींची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये श्री नवयुवक मानाची कावडयात्रा मंडळ दाळफैल, मंडळाने वेगवेगळ्या भागातून डी.जे. पारंपारिक वाद्य वाजवून भव्य मिरवणूक काढली. यामध्ये शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकीदरम्यान चोख पोलिस बंदोबस्त होता.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा