मराठा आरक्षण हाच माझा उपचार- मनोज जरांगे पाटील

0
19

 

जालना- मराठा आरक्षण हाच माझा उपचार आहे त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार.
माझा कुणालाही त्रास नाही,दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्यावर किती अन्याय कराल? आता आमच्याकडेही बघा असा इशारा मनोज जरांगे पाटील  Manoj Jarange Patil यांनी राज्य सरकारला दिला आहे.
ते म्हणाले,ओबीसी वर देखील अन्याय करू नका आणि मराठा समाजावर पण अन्याय करू नका, सरसकट आरक्षण द्या. आता हे सर्वपक्षीय नेते किती साथ देतात आणि किती काम करतात यांचे प्रेम किती खोटं आणि किती खरं आहे हे आज उघड होणार आहे. एकीकडे मुख्यमंत्री सांगतात समजून सांगू, मग येतील ते आणि समजून सांगतील. फक्त चर्चा करण्यासाठी येतात. आमचे ते ऐकत नाहीत, मग मी का ऐकायचे. तुमच्याकडे निजाम होते की नव्हते आम्हाला माहित नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा