व्हीएमएचा ‘माय स्टोरी’ उपक्रम

0
31

प्रसिद्ध व्यावसायिक निखिल कुसूमगर यांचा हितोपदेश : व्हीएमएचा ‘माय स्टोरी’ उपक्रम

नागपूर. व्यवसायाच्या स्वरूपानुसार सुव्यवस्थित प्रणाली विकसित केल्यास कमीत कमी वेळ देऊनही व्यवसाय सुरळीत चालतो. वाचलेल्या वेळेत अतिरिक्त व्यवसायाचाही विचार करता येतो. योग्य नियोजनाद्वारे एकाचवेळी अनेक व्यवसायांमध्ये यश गाठता येऊ शकते, असा हितोपदेश शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक निखिल कुसूमगर यांनी उद्योन्मूख व्यावसायिकांना दिला.

विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे रविवारी चिटणवीस सेंटरच्या सभागृहात आयोजित ‘माय स्टोरी’ उपक्रमात ते बोलत होते. ‘द हिरोज जर्नी’ या शीर्षकाखाली झालेल्या या कार्यकर्मात त्यांनी आपला 40 वर्षांचा व्यावसायिक प्रवास उलगडतानाच व्यावसायिकांना अनेक उपयुक्त टिप्सही दिल्या.

चार्टेड अकाउंटंट होण्याची इच्छा होती. मुंबईत शिक्षण सुरू होते. 1995 मध्ये ऐन अंतिम परीक्षेच्या दिवसांमध्ये वडिलांना हृदयविकाराचा धक्का आला. यामुळे परतावे लागले होते. ही घटनाच जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरली. वडिलोपार्जित सायकल विक्रीचा व्यवसाय होता. 2 वर्षे या व्यवसायसोबतच हिरो मोटोकॉर्पचा डिस्ट्रिब्युटर म्हणूनही कामाचा अनुभव होता. नागपुरात परतल्यावर व्यवसायात लक्ष घालावे लागले. त्यातून व्यावसायिक म्हणून घडत गेलो. वाईटातूनही नेहमी चांगलेच घडते, हीच शिकवण या निमित्ताने मिळाली. तोच सकारात्मक विचार आजही मनात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येकच व्यवसायाचे एक वर्तुळ असते. हिरोपूक विक्रीचा व्यवसाय सुरू असताना अडचणी येऊ लागल्या होत्या. एका फायनान्स कंपनीच्या मदतीने गाड्यांची विक्री केली. अनुभव चांगला नसला तरी त्यातूनच फायनान्स कंपनी सुरू करण्याचा विचार आला. पुढे ही कंपनीच ‘मिल्गिंग काऊ’ सिद्ध झाली. पुढे वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. अगदी रुग्णालयही सुरू केले आहे. नवीन व्यवसाय सुरू करणातना अस्तित्वातील कामावर परिणाम होणार नाही, याची काळजी घा. वेगवेगळ्या व्यवसायांची सळमीसळ होणार नाही, याची खातरजमा असावी, नवीन कामासाठी ‘लर्निंग कॉस्ट’ द्यावीच लागते, अडचणीची वेळ आलीच तर पूर्वीपासूनच आर्थिक तरतूद असावी, व्यवसाय उभारी घेण्यासाठी वेळ लागतोच, हे ध्यानात ठेवा. महत्त्वाचे म्हणजे नवीन व्यवसाय निट चालला नाही तर बाहेर कधी पडायचे, किती वेळ द्यायचा, ते पूर्वीच ठरलेले असावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फार आनंद किंवा दुःखी असताना कोणतेच निर्णय घेऊ नका, असे सल्ले चुकतातच, आदी टीप्स त्यांनी दिल्या.

स्वतःची बॅलेंशीट अधिक महत्त्वाची

व्यवसाय आणि स्वतःला किती वेळ द्यायचा, ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. पैसा कमाविण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष योग्य नाही. यामुळे व्यवसायात गुरफटून जायचे नाही. पैशांसोबतच जीवनातील आनंदही महत्त्वाचा आहे. यामुळे आपली स्वतःची बॅलेंशीट अधिक महत्त्वाची असल्याचे कुसूमगर म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा