ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी सर्व शाखीय तेली समाजाची बैठक

0
19

 

नागपूर – मंगळवारी जवाहर विद्यार्थी गृह सिविल लाईन येथे तेली समाजाच्या सर्व संघटनेचे प्रमुख, कार्यकर्ते सर्व पक्षाचे प्रमुख व कार्यकर्ते यांची बैठक झाली.
या बैठकीत तीन ठराव पारित करण्यात आले .यात ओबीसीच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि संविधान चौक येथे चालू असलेल्या सर्व शाखीय कुणबी ओबीसी समाजाच्या आंदोलनाला तेली समाज संघटनेचा पाठिंबा जाहीर करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
बैठक संपन्न झाल्यानंतर संविधान चौक येथे जाऊन जाहीर पाठिंब्याची प्रत आंदोलकांना देण्यात आली. लगेच नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांना ओबीसीच्या आरक्षणातून एक टक्का सुद्धा आरक्षण इतर समाजाला देऊ नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
तेली समाजाच्या या बैठकीला सर्वश्री रमेशजी गिरडे, सुभाष घाटे, ईश्वर बाळबुधे, शेखर सावरबांधे, उमेश शाहू, गंपूजी घाटोळे, गंगाधरजी रेवतकर,बळवंत मोरघडे, रवींद्र येनुरकर, कृष्णाजी बेले, मंगला गवरे, रेखा भोंगाडे, विलासजी मुंडले, सतीश देऊळकर, गजानन भजबुजे, मंगेश सातपुते, रामरक्षाजी शाहू, नारायणजी शाहू, नरहरी सुपारे, देवाची ढगे, राजू माहुरे, रमेश कारेमोरे, राहुल किरपान, सविता कुलरकर, बबीता मेहर, स्वाती जयस्वाल, अरुण धांडे, मंगला मस्के, राकेश इखार, प्रवीण बावनकुळे, कृष्णा घुग्गुसकर, प्रदिप वाडीभस्मे, आशिष सुपारे, नरेंद्र दिवटे, विशाल बांद्रे, विष्णू बोंद्रे, सुभाष ढबाले, रमेश आकरे, पंकज वंजारी,गणेश हांडे, गजानन दांडेकर, शैलेश थोराणे, जगदीश वैद्य, पुष्कर डांगरे, अरुण मोगरकर, कुणाल पडोळे, आशिष वांदिले, मिलींद चकोले,अनिल गुजरकर, बापू चरडे, नाना झोडे, ज्ञानेश्वर वंजारी, मोरेश्वर फटींग, सुरेश रेवतकर आदी विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचालन मंगेश सातपुते यांनी केले, प्रास्ताविक सुभाष घाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण बावनकुळे यांनी केले.
या बैठकीला अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व मान्यवरांनी आपली भूमिका स्पष्ट करत ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच यापुढे आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याची ग्वाही दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा