पाकिस्तानचे दोन गोलंदाज स्पर्धेबाहेर

0
17

आज भारत वि. श्रीलंका

कोलंबो Colombo : आशिया कपमध्ये  India भारताने काल PAKISTAN  पाकिस्तानचा अत्यंत लाजीरवाणा पराभव केला. भारताने पाकिस्तानचा तब्बल २२८ धावांनी पराभव केला. (Ashia Cup 2023) मात्र, पाकिस्तानच्या समस्या संपलेल्या नसून पाकिस्तानचे स्टार गोलंदाज हरिस रौफ औणि नसीम शाह Haris Rauf and Naseem Shah हे जखमी झाल्यामुळ स्पर्धेबाहेर झाले आहेत. पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज आगा सलमानही रुग्णालयात असून तो देखील स्पर्धेबाहेर जाऊ शकतो, असे संकेत आहेत.

कोलंबोमध्ये सामन्याच्या पहिल्या दिवशी जखमी झाल्याने राखीव दिवशी हरिस रौफने गोलंदाजी केली नाही आणि तो मैदानाबाहेर राहिला. हाताच्या समस्येमुळे नसीम शाह भारतीय डावाच्या ४९व्या षटकात मैदानाबाहेर गेला आणि फलंदाजीसाठी मैदानात परतला नाही. या दोन्ही खेळाडूंच्या दुखापती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पाकिस्तानचे वैद्यकीय पथक दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाकिस्तानने राखीव खेळाडूंना श्रीलंकेत बोलावले आहे. त्यात शाहनवाज दहानी आणि जमान खान यांचा समावेश आहे. दरम्यान, रवींद्र जडेजाच्या चेंडूवर आगा सलमान हेल्मेटशिवाय फलंदाजी करत असताना जखमी झाला. त्याच्या डोळ्याच्या खाली चेंडू आदळल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. सामना संपल्यानंतर आगाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पाकिस्तानच्या पराभवानंतर आता पाकिस्तानपुढे संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध जिंकावेच लागणार आहे.
आज भारत वि. श्रीलंका
दरम्यान, स्पर्धेतील सुपर-4 टप्प्यातील चौथा सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी ३.०० वाजता सामना सुरू होईल. नाणेफेक दुपारी अडीच वाजता होईल.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा