जरांगेंना विनंती करण्यासाठी मंत्री उपोषणस्थळी पोहोचले

0
25

जालना JALNA  – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी  MNOJ JRANGE  उपोषण मागे घ्यावे, यासाठी विनंती करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक  SAMBHAJI BHIDE संभाजी भिडे यांचीही उपोषणस्थळाला भेट दिली. काल पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जरांगे यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन करणारा सर्वपक्षीय ठराव झाला होता. आता शासनाकडून त्यांना विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, दुपारी यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत आहे. अखेर गावकऱ्यांनी त्यांना सालाईन घेण्याचा आग्रह केल्यावर जरांगे यांनी सलाईन घेतले आहे. डॉक्टरांच्या पथकाने रात्री साडेबारा वाजता त्यांच्या आरोग्याची तपासणी केली. त्या नंतर मनोज जरांगे यांना सलाईन लावण्यात आले. सरकारने योग्य कारण दिले तर आपण दोन पावले मागे यायला तयार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा