आता ओबीसी देखील उद्यापासून आंदोलनावर

0
29

छत्रपती संभाजीनगर (CHATRPATI SAMBHAJI NAGAR) : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation Issue) मुद्दा पेटला असताना आता ओबीसी देखील आंदोलनावर उतरणार आहेत. ओबीसमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध होत असून (OBC) ओबीसी समन्वय समितीने यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. १३ सप्टेंबर रोजी शहरातील क्रांतीचौकात हे आंदोलन होणार आहे. रविवारी पार पडलेल्या बैठकीत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओबीसी समन्वय समितीच्या वतीने ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधील समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. ओबीसींच्या विविध मागण्या आणि ओबीसींवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात चर्चा झाली. या चर्चेनंतर आंदोलन निश्चित करण्यात आले. मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधून ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये, सर्व जातीची जातनिहाय जन- गणना त्वरित करावी, आजतागायत मराठा समाजाला कुणबी (ओबीसी) म्हणून दिलेली जातींची प्रमाणपत्रे रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ओबीसी, (व्हिजेएनटी, एसबीसी) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी, ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. ती त्वरित चालू करावी, सरकारी उद्योगांचे खासगीकरण थांबून सरकारी नोकऱ्यांच्या खासगीकरणाचा अध्यादेश तत्काळ रद्द करण्यात यावा, अशा मागण्या समन्वय समितीच्या मागण्या असल्याचे सांगण्यात आले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा