“उद्धव ठाकरे ‘विदुषक’ आहेत..”, भाजपचा पलटवार

0
21

मुंबई-भाजप आणि ठाकरे गटातील शाब्दिक युद्ध अधिकच तीव्र झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यावर आता भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना विदुषकाची उपमा दिली आहे. राज्यात विदुषकांची टोळी फिरत असून त्यात संजय राऊत, भास्कर जाधव आणि तिसरा म्हणजे दोघांचा मास्टर विदुषक उद्धव ठाकरे असल्याची टीका त्यांनी केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, ठाकरेंकडे दुसरे काम उरले नाही म्हणून ते करमणूक करत आहेत. पण ते काम देखील त्यांना नीट जमत नाही. आमच्या नेत्यांच्या नादी लागू नका. तुम्ही आमच्या नेत्यांवर बोलाल पण यापेक्षा कडक उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी दिला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांना गोध्रा दिसते. उद्धव ठाकरे हिंदू विरोधी झाले आहेत. ३७० कलम हटवून दाखवणे, हा पुरुषार्थ आहे. पण उद्धव ठाकरे यांचा पुरुषार्थ काय तर कोविड काळात भ्रष्टाचार, पत्राचाळ घोटाळा, यात आहे. राम मंदिर हे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. आज नरेंद्र मोदी ते स्वप्न पूर्ण करत आहेत. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यात बदल झाला. उद्धव ठाकरे आधी हिंदू विरोधी होते. आता तर ते श्रीरामांच्या विरोधात गेले आहेत, असेही “त्या म्हणाल्या. जळगावमधील जाहीरसभेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. त्याला आज भाजपच्या वतीने प्रत्युत्तर देण्यात आले.
पत्रकार परिषदेही विदुषक
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना विदुषकाची उपमा देताना भाजपने पत्रकार परिषदेत विदुषकाची वेशभुषा केलेल्या कलाकाराला आणले होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा