का फिरविली शेतकऱ्यांनी पोळा साहित्य खरेदीकडे पाठ ?

0
49

 

यवतमाळ  YAWATMAL – शेतकर्‍यांच्या शेतात वर्षभर राबणार्‍या सर्जा-राजाचा सण अवघ्या एका दिवसांवर आला आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने heavy rain शेतकर्‍यांच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातात ऐन पोळ्याच्या तोंडावरच पैसा नसल्याने चिंतेचे सावट पसरले आहे. यवतमाळ शहरातील बाजारपेठेत अजूनही शेतकरी खरेदीसाठी आले नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांना दिवसभर ग्राहकांच्या प्रतिक्षेत बसून राहावे लागत आहे.POLA 2023 
जिल्ह्यात गेल्या जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतपिकांसह जमीन खरडून गेल्याने शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे. सरकारने शेतकर्‍यांना मोठमोठे आश्‍वासन दिले. परंतु, ते आश्वासन कोरडे निघाल्याची ओरड होत आहे. पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी शेतकर्‍यांच्या हातात एक पैसाही नाही. त्यामुळे सण साजरा कसा करावा, याची चिंता शेतकर्‍यांना पडली आहे. तर, सर्जा-राजाला सजविण्यासाठी लागणार्‍या साहित्याने दुकाने सजली आहेत, प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा