
नाशिक: पावसाअभावी सोयाबीन पीक शेंगा न लागता जळू लागल्याने लासलगाव येथील तरुण शेतकऱ्याने नऊ एकर सोयाबीन पिकावर रोटर फिरवत पीक नष्ट केले. या शेतकऱ्याने दोन महिन्यापूर्वी झालेल्या पावसावर नऊ एकर सोयाबीन पीक घेतले होते. त्यानंतर पावसाने दडी मारली सोयाबीन पीक आले मात्र त्याला शेंगाच लागल्या नाही. चार दिवसांपूर्वी रिमझिम पाऊस झाला मात्र या पावसाचा कोणताही प्रकारे सोयाबीनला फायदा न झाल्याने हताशपणे या तरुण शेतकऱ्याने सोयाबीन पीक नष्ट करून टाकले. मागील वर्षी या शेतकऱ्याने सोयाबीनचे पीक घेतले.त्याला दीड ते दोन लाख रुपये फायदा देखील झाला होता.सोयाबीन मधून चांगले उत्पन्न मिळेल या आशेने यावर्षी देखील लाखो रुपये खर्च करून सोयाबीन पिकवली. मात्र पाऊसच न पडल्याने अक्षरशः पिक जळून खाक झाले.