खडसेंवर राजकीय वर्तुळाचे लक्ष

0
28

रावेर लोकसभा लढण्याची तयारी

जळगाव JALGAW -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  SHRAD PAWAR शरद पवार यांच्या गटाने आतापासूनच लोकसभेची तयारी सुरु केली आहे. (Eknath Khadse to contest Raver Lok Sabha) त्याअंतर्गत पक्षाने एकनाथ खडसे यांना रावेरमधून लोकसभा लढण्याची तयारी सुरु करण्याची सूचना केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. एकनाथ खडसे रावेरमधून लढल्यास त्यांच्याविरुद्ध सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यमान खासदार व त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे रिंगणात उतरणार की कसे, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केले आहे. खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असली तरी त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे या भाजपमध्येच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने एकनाथ खडसे यांना रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्यास 2024मध्ये रावेरमध्ये सून विरुद्ध सासरे अशी लढत बघायला मिळू शकते, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा