इंडिया आघाडीची बैठक: जागावाटपावर चर्चा होणार

0
18

नवी दिल्ली-विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक आज नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार असून या बैठकीत जागावाटप तसेच काही उमेदवारांची नावे निश्चित करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (I.N.D.I.A. Coordination Committee Meeting) या बैठकीत आघाडीतील १४ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत भाजप विरोधात संयुक्त उमेदवार देण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या सोबतच सोशल मीडिया समिती आणि प्रचार समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेवर समन्वय समिती चर्चा करून अंतिम मान्यता देण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीच्या भविष्यातील सामूहिक कार्यक्रमांची रूपरेषा देखील आज शरद पवार यांच्या घरी होणाऱ्या बैठकीत तयार करण्यात येण्याची शक्यता आहे. मागील कामगिरीच्या आधारे राज्यांमधील जागावाटपावर चर्चा होऊ शकते. अनेक राज्यांमध्ये आघाडीतील घटक पक्षांमध्ये वाद आहेत. यामुळे हा वाद टाळण्यासाठी ही समिती पुढाकार घेऊ शकते. आघाडीच्या प्रचारसभांवरही या बैठकीत निर्णय होऊ शकतो, असे संकेत आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा