विदर्भाची जवाबदारी ज्या नेत्याला दिली. तो फक्त जिल्हापर्यंतच राहिला !

0
23

रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा

नागपूर – आज नागपूरला आलो, विदर्भातील निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्ते जे पवार साहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवतात. त्यांच्या भेटी घेणार. पुढच्या महिन्यात 3 ते 4 तारखेला प्रत्येक जिल्ह्यात जाणार आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. देशात संविधान विरोधी वातावरण आहे. बाबासाहेबांचे विचारांचे स्मरण करून संविधान बदलणाऱ्या विचारांचा पराभव करण्यासाठी इथे नतमस्तक झालो
– लोक संख्येचे प्रमाण बघितल्यानंतर केंद्राने जीआर काढून ईडब्ल्युएस कोटा आणला. सरकारला मराठा, मुस्लिम आरक्षण द्यायचेच असेल तर आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे विधायक लोकसभेत आणण्याची गरज आहे. आता होणाऱ्या विशेष अधिवेशनात हा निर्णय घ्यावा. गरज पडल्यास आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. यात राजकारण न करता हा प्रश्न सोडवला पाहिजे, तरच समाजाला न्याय मिळू शकतो.
भाजपचे काही कार्यकर्ते ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहेत. ते कोर्टात गेले. भाजप नेहमी दुटप्पी भूमिका घेतात. राज्यात धनगर आरक्षण बोलतात केंद्रात त्याला विरोध करतात. भाजप पूर्वीपासून आरक्षणाच्या विरोधात आहे. मुळात आरक्षण देण्याची भाजप मध्ये इच्छा शक्ती आहे का? तीन इंजिन सरकारचे विचार केंद्रातील मोठ्या इंजिन समोर चालतात का? हा मूळ प्रश्न आहे. संधी असताना सत्तेत न जाता मी संघर्षात सहभागी झालो, मी विचारांसाठी आलो असेही आ रोहित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री व्हिडिओ संदर्भात छेडले असता, आम्ही त्या व्हिडिओचा निषेध करतो. बोलायचं आणि मोकळ व्हायचं. म्हणजे त्यात राजकारण करत आहात. जनतेच्या प्रश्नांवर सिरियस नसतात. फक्त पदं मिळविण्यासाठी नेते सिरियस आहेत असा आरोप केला. अजित पवार यांच्या कंत्राटीकरण खाजगीकरण धोरणाविषयी बोलताना जे चाळीस आमदार शिंदे गटासोबत गेले त्यांच्या सुरक्षेवर वर्षात दीडशे कोटी खर्च, जाहिरातीवर 50 कोटी, शासन आपल्या दारी एका सभेला 10 कोटी खर्च येतो हे खर्च कमी करा असा सबुरीचा सल्ला दिला. खरे म्हणजे आजचे नेते राज्य चालवायला सक्षम नाहीत. 30 लाख तरुण नोकरीसाठी प्रयत्न करत असताना ही त्यांची चेष्टा आहे. प्रफुल्ल पटेल यांनी पवार गटाच्या नेत्यांवर केलेल्या आरोपांना आजच्या निष्ठावान गटाच्या बैठकीतून उत्तर देण्यात आले.
विदर्भाची जवाबदारी ज्या नेत्याला दिली. तो फक्त जिल्हापर्यंतच राहू शकला. त्याला साहेबांनी केंद्रात मंत्रिपदाची जवाबदारी दिली. मात्र त्यांनी साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले नाही. पार्टीला त्यांचा फायदा झाला नाही असे टीकास्त्र आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सोडले.
ज्यांनी विचार बदलला जे सतत भाजप विरोधात बोलले ते आज भाषण करण्यासाठी काहीही बोलत असेल तर ते खरं समजायला नको. अनेक वेळा आमदारांच्या सही कागदांवर घेतल्या. आमचेच नेते सह्या घेत असल्याने आम्ही विश्वास केला. कधीतरी त्याचा असा वापर होईल असं वाटलं नव्हतं असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. अमोल मिटकरी यांच्याबाबतीत
माझे पहिलं समर्थन होतं असं म्हणतात. पण मला आता त्याच्यावर जास्त बोलून वेळ वाया घालवायचा नाही. आमचं वय पाळण्यात आहे अस वाटत असेल तरी आम्ही लहान वयात शाहू, फुले आंबेडकर यांचे विचार जपले, हे अनुभवी असताना त्यांनी विचार का जोपासले नाहीत, असा सवाल केला

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा